विकसकाच्या फायद्यासाठी निविदा अटींमध्ये बदल? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - विकसकाच्या फायद्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने निविदांच्या अटींमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. निविदापूर्व बैठकीत विकसकाने अटींमध्ये बदल करण्याची मागणी लावून धरल्यानंतर मंडळाने हा बदल केला. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी म्हाडा प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

मुंबई - विकसकाच्या फायद्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने निविदांच्या अटींमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. निविदापूर्व बैठकीत विकसकाने अटींमध्ये बदल करण्याची मागणी लावून धरल्यानंतर मंडळाने हा बदल केला. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी म्हाडा प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

गोरेगाव येथील इनऑर्बिट मॉलजवळ म्हाडाच्या मालकीचा 15 एकर भूखंड आहे. मात्र, त्यावर एका महिलेने दावा केला होता. त्याबाबत 25 वर्षे सुरू असलेली न्यायालयीन लढाई म्हाडाने जिंकली. हा भूखंड 2015 मध्ये म्हाडाच्या ताब्यात आला. त्यानंतर म्हाडाने येथे गृहप्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार किमान हजार घरांचा प्रकल्प उभारण्यासाठी मुंबई मंडळाने विकसकांकडून निविदा मागवल्या आहेत. या प्रकल्पाची निविदापूर्व बैठक 30 डिसेंबरला झाली. बैठकीला एल ऍण्ड टी, टाटा, शापूरजी पालनजी, सिप्लेकस, बी. जी. शिर्के यांच्यासह दहा नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यातील काहींनी निविदा स्वीकृती आणि निविदा प्रक्रियेत बदल सुचवले. गोरेगाव येथील भूखंडावर 24 मजल्यांचे टॉवर उभारण्यासाठी कंपनीने 14 मजल्यांचे बांधकाम केल्याची अट म्हाडाने निविदेत ठेवली आहे. मात्र, पंतप्रधान आवास योजनेच्या कामासाठी सात मजल्यांची अट असल्याने म्हाडानेही निविदेत बदल करून 14 ची अट रद्द करून ती सात मजल्याची करावी, अशी सूचना एका कंपनीने केली आहे. त्यानुसार मुंबई मंडळाने या बदलाचा प्रस्ताव तयार केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

म्हाडाच्या या प्रस्तावास प्राधिकरणाने मंजुरी दिल्यास संबंधित कंपनीला हे कंत्राट मिळेल; अन्यथा ही कंपनी निविदा प्रक्रियेतून बाद होईल, असेही सूत्रांनी सांगितले. 

निविदापूर्व बैठकीला विकसकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. निविदेतील विविध मुद्यांवर विकसकांनी म्हाडाला सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रस्ताव तयार करून म्हाडा प्राधिकरणाकडे पाठविण्यात येईल. 
- सुभाष लाखे,  मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी 

Web Title: mumbai news MHADA