चार लाख 97 हजार अर्जदार परीक्षेच्या प्रतीक्षेत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

मुंबई - एसटी महामंडळाने विविध पदांसाठी 14 हजार 247 कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत (फेब्रुवारीचा तिसरा आठवडा) तब्बल चार लाख 97 हजार 753 अर्ज दाखल झाले आहेत. मार्च किंवा एप्रिलमध्ये त्यांची लेखी परीक्षा घेण्याची घोषणा हवेत विरली असून अर्जदार परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. 

मुंबई - एसटी महामंडळाने विविध पदांसाठी 14 हजार 247 कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत (फेब्रुवारीचा तिसरा आठवडा) तब्बल चार लाख 97 हजार 753 अर्ज दाखल झाले आहेत. मार्च किंवा एप्रिलमध्ये त्यांची लेखी परीक्षा घेण्याची घोषणा हवेत विरली असून अर्जदार परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. 

एसटी महामंडळ लिपिक टंकलेखक, सहायक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, लेखाकार, भांडार पर्यवेक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, सहायक सुरक्षा निरीक्षक, आगरक्षक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि विद्युत, सहायक कार्यशाळा अधीक्षक, प्रभारक, वरिष्ठ संगणित्र चालक, चालक, वाहक अशा विविध पदांसाठी 14 हजार 247 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाच्या वेबसाईटवर अर्ज भरण्याची प्रक्रिया 12 जानेवारी 2017 पासून सुरू झाली. ही मुदत 11 फेब्रुवारीला संपली. यासाठी चार लाख 97 हजार 753 

अर्ज महामंडळाकडे दाखल झाले. यात सर्वाधिक सात हजार 923 चालक, वाहक पदासाठी 68 हजार 835 अर्ज, दोन हजार 548 लिपिक टंकलेख पदासाठी एक लाख 75 हजार 695 अर्ज, तसेच तीन हजार 293 सहायक (मॅकेनिक) पदासाठी 83 हजार 498 अर्ज, 148 वाहतूक निरीक्षक पदासाठी 17 हजार 745 अर्ज, तर आगरक्षक या एका पदासाठी तीन हजार 973 अर्ज आले. त्यानंतर विविध पदांसाठी लेखी, तसेच संगणकावर परीक्षा मार्च किंवा एप्रिल महिन्यात घेण्यात येईल, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले होते; परंतु एसटी महामंडळाकडून परीक्षेची तारीखच जाहीर करण्यात आलेली नाही. 

वेग मंदावला 
एसटीच्या भरतीचे काम हे खासगी संस्थांमार्फत सुरू आहे. त्यामुळे नव्या भरती प्रक्रियेनुसार वाहक दोन महिन्यांत, तर चालकांची भरती तीन महिन्यांत होणे अपेक्षित होते. अन्य पदांच्या कर्मचाऱ्यांची भरती दोन महिन्यांत अपेक्षित होती; परंतु या भरती प्रक्रियेत एसटी महामंडळाकडून मोठा विलंब झाला आहे. 

गणेशोत्सवात चालक, वाहकांची कमतरता 
गणेशोत्सव काळात कोकणासाठी अनेक शहरांतून मोठ्या प्रमाणात जादा बस सोडल्या जातात. एसटी सेवेचा बोजवारा उडू नये आणि चालक कमी पडू नये, यासाठी राज्यातील अन्य विभागांत असणाऱ्या चालकांना कोकणात पाठवण्यात येते. यावेळी नवीन भरती झालेले कर्मचारी देण्याचे निश्‍चित केले होते. मात्र परीक्षाच झाली नसल्याने पेच आहे. 

विविध पदांसाठी जूनच्या अखेरच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परीक्षा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवीन चालक, वाहक भरती गणेशोत्सवापर्यंत झाली नाही, तरीही त्याचा परिणाम होणार नाही. 
- रणजिंत सिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ. 

Web Title: mumbai news msrtc recruitment

टॅग्स