एसटीच्या ४० टक्के बस नवीन लोगोविना?

संतोष मोरे
शनिवार, 13 जानेवारी 2018

मुंबई - कर्नाटक सरकारने ‘जय महाराष्ट्र’ घोषणेवर बंदी घातल्यानंतर शिवसैनिकांनी कर्नाटकच्या एसटी बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून त्याचा निषेध केला होता. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील एसटी बसवर अभिमानाने ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेले दिसून येईल, असे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर एसटीच्या काही बसगाड्यांवर ‘जय महाराष्ट्र’ असलेला नवीन लोगो लावण्यात आला; मात्र अद्याप ४० टक्के एसटी बसेसवर जुनाच लोगो असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कर्नाटक सरकारने ‘जय महाराष्ट्र’ घोषणेवर बंदी घातल्यानंतर १५ दिवसांतच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने लोगोमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा समावेश करून तो लोगो असलेली पहिली बस बेळगावर मार्गावर चालवली होती. एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनी महामंडळाचा नवीन लोगो प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात महाराष्ट्राच्या भगव्या नकाशावर ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेले होते. एसटीच्या १८ हजार ५०० बस आहेत. त्यातील जवळपास ४० टक्के बसवर अद्याप जुनाच लोगो असून नवीन लोगो लावण्यास एसटी महामंडळाला विसर पडला असल्याचे बोलले जात आहे. मुंबई, पुणे ही प्रमुख शहरे वगळता ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी बसवर अद्याप जुनाच लोगो लागला आहे.

राज्यातील सर्व वर्कशॉपना एसटी बसवर नवीन लोगो लावण्याचे निर्देश दिले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे तसे नवीन लोगो लागलेही आहेत. तरी सर्व एसटीवर लोगो लागले आहेत की नाही याची माहिती घेतली जाईल. त्यानंतर त्वरित त्यांना नवीन लोगो लावण्याचे आदेश देण्यात येतील.
- रणजितसिंग देओल  (उपाध्यक्ष, एसटी महामंडळ)

Web Title: mumbai news MSRTC st bus without logo