ग्रंथालयाच्या बांधकामाला विद्यापीठाचा अक्षम्य विलंब 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील ग्रंथालयाच्या बांधकामात दिरंगाई होत असल्याने विद्यापीठाला आर्थिक फटका बसला आहे. दीड वर्षापासून धीम्या गतीने बांधकाम सुरू आहे. त्यामुळे तब्बल दोन कोटी 47 लाखांचा वाढीव खर्च विद्यापीठाला करावा लागत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना ही माहिती मिळाली आहे. 

विद्यापीठाच्या "आंबेडकर भवन'लगत ग्रंथालयाचे बांधकाम सुरू आहे. 18 फेब्रुवारी 2015 रोजी या बांधकामाला सुरुवात झाली. केवळ नऊ महिन्यांत बांधकाम पूर्ण करायचे होते. या दोन मजली इमारतीचे बांधकाम दीड वर्षांपूर्वी सुरू झाले तेव्हा 24 कोटी 86 लाख 30 हजार 125 रुपये एवढा खर्च अपेक्षित होता. 3 जुलै 2017 पर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर आता दोन कोटी 46 लाख 60 हजार 274 रुपये इतका वाढीव खर्च विद्यापीठाला करावा लागणार आहे. 

7 एप्रिल 2017 रोजी सहायक ग्रंथपाल यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते गलगली यांना कळवल्यानुसार विद्यापीठाकडे सात लाख 70 हजार 364 इतकी पुस्तके आहेत. अन्य कामांच्या माहितीसाठी गलगली यांचा अर्ज विद्यापीठ अभियंता शाखेकडे पाठवण्यात आला. तेथील प्रमुख विनोद पाटील यांनी दोन महिन्यांनंतर गलगली यांना माहिती पाठवली. विद्यापीठाच्या बांधकाम स्थापत्य समितीचे प्रमुख कुलगुरू असताना जवळपास दोन कोटी 47 लाखांच्या वाढीव खर्चाचा भुर्दंड समितीच्या सर्व सदस्यांकडून वसूल करावा, अशी मागणी गलगली यांनी केली आहे. 

काम वेळेत पूर्ण न झाल्याने आज मोडकळीस आलेल्या ग्रंथालयात हजारो विद्यार्थी जीव संकटात घालून ये-जा करतात. ज्या उद्देशाने विद्यापीठाने हे बांधकाम सुरू केले, त्याला हरताळ फासत वाढीव रकमेची खिरापत देण्याच्या या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. 
- अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते 

Web Title: mumbai news mumbai university

टॅग्स