आयआयटीयन्सना नोकऱ्यांची संधी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

मुंबई - पवईतील आयआयटी या शैक्षणिक संस्थेतील प्लेसमेंटने तीन दिवसांतच नवा विक्रम केला आहे. यंदा दोन वर्षांहून अधिक नोकऱ्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळाल्या आहेत. तीन दिवसांत आयआयटीच्या विद्यार्थ्यांना शंभरहून अधिक ऑफर आल्या आहेत. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना जास्त नोकऱ्या मिळत आहेत, अशी माहिती आयआयटीच्या प्रवक्‍त्यांनी दिली.

१ डिसेंबरपासून आयआयटी प्लेसमेंट सीझनला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी मायक्रोसॉफ्ट आणि उबर यांसारख्या परदेशी कंपन्यांनी विद्यार्थ्यांना नोकऱ्या देऊ केल्या. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन चांगल्या पगाराच्या नोकऱ्या यंदाच्या प्लेसमेंट सीझनमधून मिळतील, अशी शक्‍यता वर्तवण्यात आली होती. 

यंदा तब्बल एक हजार ७०० विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नोंदणी केली आहे. १३८ कंपन्यांनी प्लेसमेंटआधीच विद्यार्थ्यांना नोकरी देऊ केली. 

दुसऱ्या दिवशी मायक्रोसॉफ्ट या कंपनीने एका विद्यार्थ्याला एक कोटी ३८ लाखांचे वार्षिक पॅकेज दिले. तिसऱ्या दिवशी क्‍लीनमॅक्‍स, सिटी, रॉबर्ट बोस्च, सॅप लॅब्स या कंपन्यांनी विशेषतः आयआयटीच्या विद्यार्थ्यांची दखल घेतली. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या २० टक्‍क्‍यांनी जास्त ऑफर आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळाल्या आहेत. त्यात अमेरिकी कंपन्यांची संख्या मोठी आहे. त्याखालोखाल जपानी कंपन्यांच्या ऑफर येत आहेत. 

तीन दिवसांतील घडामोडी
 दोन वर्षांपेक्षा यंदा जास्त ऑफर. संपूर्ण आकडेवारी प्लेसमेंट सीझन संपल्यानंतर जाहीर होईल. 
 यंदा परदेशी कंपन्यांच्या ऑफर - ४७ 
 प्लेसमेंटपूर्वीच मिळालेल्या नोकऱ्या -  ६० 

२०१६ 
कंपनीचे नाव     - २०१६ 
इंटेल टॅक्‍नॉलॉजी     - २९
सॅमसंग आर. ॲण्ड डी.     - २८
सिटी क्रॉप     - २०
गॉल्डमन साच्स     - १५
क्वालकॉम     - १३  
एकूण नोकऱ्या     - १०५

Web Title: mumbai news Opportunities for IITIsans IIT Placement