एसआरए भ्रष्टाचार तक्रारींचा  मुख्यमंत्री कार्यालयात पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील कथित गैरव्यवहाराच्या हजारो तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे आल्या आहेत. या तक्रारी निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने गेल्या आठवड्यात शेकडो फाईल झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडे (एसआरए) पाठवल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

मार्गी लागलेले प्रकल्प आणि सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये सोसायटीचे पदाधिकारी, विकसक आणि ‘एसआरए’ अधिकारी संगनमताने नियम धाब्यावर बसवून इमारतींचे काम रेटत आहेत. अनेक ठिकाणच्या प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आहेत. तक्रारदार झोपडीधारकांची दखल ‘एसआरए’ घेत नसल्याने गेल्या आठवड्यात अशा शेकडो नागरिकांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांकडे तक्रारींद्वारे मांडली आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरांत तीन हजार २९३ झोपडपट्ट्यांमध्ये पुनर्वसन योजना राबवण्याचा निर्णय ‘एसआरए’ने घेतला आहे. आतापर्यंत एक लाख ६२ हजार ३७६ झोपडीधारकांचे इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. एक हजार ४०४ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: mumbai news slum SRA corruption complaints