सिंचन गैरव्यवहारावरून सोशल मीडियावर खळबळ 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 जून 2017

मुंबई - राज्यात शेतकऱ्यांचा सरकार विरोधात उद्रेक सुरू असताना आज अचानक कथित सिंचन गैरव्यवहारात सक्तवसुली संचालनालया (ईडी)ची कारवाई या सोशल मीडियातील बातमीने राजकीय खळबळ उडवून दिली; मात्र यामध्ये कोणत्याही सहभागाचा "ईडी'च्या सूत्रांनी इन्कार केला. 

सिंचन गैरव्यवहारात संशयाची सुई असलेल्या राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याबाबतच्या कंपन्यासंदर्भात "ईडी'ने माहिती मागविली, अशी बातमी सोशल मीडियात अचानक झळकली. या बड्या नेत्याच्या मालकीच्या दोन कंपन्यांमधून एक हजार कोटीचे मनी लॉंडरिंग झाल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. याबाबतची कागदपत्रे "ईडी'ने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मागितल्याचा दावा करण्यात येत आहे; मात्र "ईडी'च्या मुंबईतील सूत्रांनुसार, अशा प्रकारची कोणतीही कार्यवाही अथवा कारवाई केली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या कारवाईच्या बातमीने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मात्र उडवून दिली.

Web Title: mumbai news social media irrigation scandal