गुजरातमधील चाचण्यांचे अंदाज पटले नाहीत: उद्धव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 डिसेंबर 2017

राहुल गांधींची स्तुती 
कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. "गुजरात निवडणुकीत राहुल गांधी यांनी चांगली मेहनत घेतली. पक्ष कार्यकर्त्यांच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील का ते पाहायचे आहे. ते त्यांच्या पक्षाचा विश्‍वास सार्थ करतील, अशी अपेक्षा आहे,' अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या. 

मुंबई : "गुजरातमधील जनमत चाचण्यांचे अंदाज फारसे पटले नाहीत. गुजरातमधील वातावरण आणि जनमत चाचण्यांचे अंदाज पाहिले तर ताळमेळ दिसत नाही,' असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लगावला. नागरिकांचे प्रश्‍न सुटत नसतील, तर भाजपचे समर्थन का करावे, अशा प्रश्‍नही त्यांनी पुन्हा उपस्थित केला. 

ठाणे जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह "मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी गुजरातच्या जनमत चाचण्यावर संशय व्यक्त केला. जो निकाल लागेल, तो सोमवारी कळेलच. तो आपल्याला मान्यही करावा लागेल. जेव्हा निकालासोबत खरे चित्र येईल तेव्हा तो सर्व ताळमेळ बसवावा लागेल, असा टोला त्यांनी भाजपला मारला. 

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी "एक वर्षात शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल,' असे विधान केले होते. आदित्य यांच्या या भूमिकेचे समर्थन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजपकडून चांगल्या गोष्टींच्या अपेक्षा होत्या. सत्तेत असूनही कर्जमाफी, भारनियमन, वीज जोडणी, बेरोजगारांचे प्रश्‍न सुटत नसतील तर भाजपच समर्थन कायम का ठेवावे?'' 

राहुल गांधींची स्तुती 
कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. "गुजरात निवडणुकीत राहुल गांधी यांनी चांगली मेहनत घेतली. पक्ष कार्यकर्त्यांच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील का ते पाहायचे आहे. ते त्यांच्या पक्षाचा विश्‍वास सार्थ करतील, अशी अपेक्षा आहे,' अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या. 

Web Title: Mumbai news Uddhav Thackeray statement on Gujrat election