

Mumbai-Pune Expressway Accident
ESakal
दिलीप कांबळे
मावळ : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एक चारचाकी रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या टँकरवर आदळल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून कारमधील चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.