
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू
Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सातत्याने अपघात होत आहेत, आज संध्याकाळच्या सुमारास खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताच तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
हेही वाचा- First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने
तर गाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. गाडीवरचं नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या एका कठड्याला जाऊन धडकली आणि पलटी झाली. या घटनेत गाडीचा चुराडा झाला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होत. पिडितांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आलं.
मृत चालकाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या गाडीमध्ये एकून ४ लोक होते त्यात मृत व्यक्तीची पत्नी आणि दोन मुले, बाकीच्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. आनंद घेण्यासाठी फिरायला जाणाऱ्या मुलांसमोरच वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांना जबर धक्का बसला आहे. हे कुटुंब मुंबईतील कांजूरमार्ग येथील राहिवाशी आहे. मृत विजय मंगल पाटील हे आपल्या कुटुंबासोबत मुंबईकडून पुण्याला फिरण्यासाठी चालले होते.