मुंबई- पुणे द्रुतगती मार्ग होणार "वाय-फाय' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

मुंबई - मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवाशांना वाय-फाय सेवा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. त्याकरिता कंपन्यांकडून स्वारस्य निविदा मागविल्या आहेत. "बीओटी' तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार असून, त्याद्वारे महामार्गावर नियम मोडणाऱ्यांवरही कारवाई करणे शक्‍य होणार आहे. 

द्रुतगती मार्गामुळे मुंबई -पुणे शहरांदरम्यानचा प्रवास वेगवान झाला आहे. या मार्गावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या मार्गावर घाट आणि काही परिसरात मोबाईल आणि इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी नसते, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी "एमएसआरडीसी'ने महामार्गावर मोफत "वाय-फाय' सेवा सुरू करण्याचे ठरवले आहे. कंपन्यांना ऑनलाइन निविदा भरता येणार असून, त्याला टेलिकॉम कंपन्या व अन्य सेवा पुरवठादारांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अधिकाऱ्यांना आशा आहे. 

हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास महामार्गावर मोबाईल व इंटरनेटची सुविधा अखंडितपणे उपलब्ध होणार आहे. यासह जे वाहनचालक महामार्गावर वाहतुकीचे नियम तोडतील, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीही या यंत्रणेचा आधार मिळणार असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. 

Web Title: Mumbai Pune Expressway going the way of Wi-Fi