

Mumbai Pune Expressway Missing Link Work
ESakal
बापू सुळे
मुंबई : मुंबई-पुणे दरम्यानच्या प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी एमएसआरडीसी उभारल्या जाणा-या मिसिंग लिंकच्या कामाला धुव्वाधार पावसामुळे लेटमार्क लागणार आहे. बोगदे आणि केबल स्टे ब्रीज असलेल्या हा प्रकल्प नियोजित वेळापत्रकानुसार डिसेंबर अखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे. तर मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकल्पाचे काम नोव्हेंबर अखेर पूर्ण करावे असे बजावले होते. मात्र धुव्वाधार पाऊस आणि दरितून जोरदार वाहणा-या वा-याचा या पूलाच्या कामाच्या वेगावर परिणाम झाला असल्याने पूर्ण होण्यासाठी जानेवारी-फेब्रुवारी महिना येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना मिसिंग लिंकच्या प्रवासासाठी आणखी काहीकाळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.