मुंबई, पुण्याचा महापौर ठरवायचा कुणी?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

- प्रतिक्रिया नोंदवा...
- मत सविस्तर असेल, तर webeditor@esakal.com वर ई मेल करा. Subject लिहा CitizenJournalist
- 'सकाळ संवाद' अॅप डाऊनलोड करून आपलं मत नोंदवा

मुंबईचा महापौर कुठल्या पक्षाचा होणार आणि पुण्याचा महापौर मुळ भाजपचा की बाहेरून भाजपमध्ये आलेल्यांमधून होणार या दोन विषयांवरून सध्या किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी बरीच उत्सुकता आहे. मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार असेल आणि तोही भाजपच्या पाठिंब्याशिवाय, तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर अभूतपूर्व परिणाम होणार आहे. कमी-अधिक प्रमाणात हीच अवस्था पुण्याच्या महापौरपदाबाबत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून 'इलेक्टिव मेरीट'वर आयात केलेल्या नेत्यांमधून एखादा महापौर झाला, तर भाजपसाठी वर्षानुवर्षे खपलेल्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर न मिटणारा ओरखडा उठणार आहे.

मुंबईत कधी शिवसेना - काँग्रेस आघाडीची चर्चा सुरू होते आहे, तर पुण्यात कधी भाजपबाहेरच्या कार्यकर्त्यांना महापौरपद मिळणार असल्याचे पसरवले जात आहे. अजून चार-सहा दिवस चर्चा, वावड्या उठतच राहणार आहेत आणि नंतर नेत्यांना मध्यममार्ग काढावा लागणार आहे. शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करण्यात गैर काय, असा प्रश्न भाजपविरोधक जम्मू-काश्मीर सरकारमधल्या भाजपच्या सहभागाचे उदाहरण देऊन करत आहेत; तर ज्यांच्या बळावर पुण्यात सर्वाधिक जागा आल्या, त्यांना डावलण्याने भाजपला 'स्मार्ट सिटी'त काम कसे करता येईल, असा सूर नवखे भाजपवासी आळवत आहेत.

राजकीय नेते मतदारांचा कानोसा घेत असतात, असं म्हटलं जातं. खरंच घेतात की नाही, नेमकं ठावूक नाही. घेत असतील, तर मतदार म्हणून आपल्याला मुंबई आणि पुण्यातील राजकीय परिस्थितीवर काय बोलावंसं वाटतं? मुंबई, पुण्यात कुणी सत्तेवर यावं, हे मतदारांनी ठरवावं की चार नेत्यांनी बंद खोलीत निर्णय घ्यावा? मत देताना आपण ज्या पक्षांसोबत राहिलो, त्यांनी अचानक धोरणं बदलली तर...? बहुमत कुणाचं हे राजकीय पक्षांनी ठरावयंच मत दिलेल्या मतदारांनी? आपलं मत काय?

- प्रतिक्रिया नोंदवा...
- मत सविस्तर असेल, तर webeditor@esakal.com वर ई मेल करा. Subject लिहा CitizenJournalist
- 'सकाळ संवाद' अॅप डाऊनलोड करून आपलं मत नोंदवा

Web Title: Mumbai, Pune mayor who decide?