

Roads Closed And Diversions Planned For New Year Eve
Esakal
नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोपासाठी जग सज्ज झालं आहे. भारतात दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई यासह मोठ्या शहरांमध्ये नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी म्हणून प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मुंबईत मरीन ड्राइव्ह, गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी या ठिकाणी प्रचंड गर्दी होते. या ठिकाणी पोलिसांची करडी नजर असणार आहे.