Vice Chancellor : मुंबई, पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंसाठी अखेर निवड समित्या जाहीर

मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज निवड समित्या जाहीर केल्या आहेत.
Mumbai and Pune University
Mumbai and Pune Universitysakal
Summary

मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज निवड समित्या जाहीर केल्या आहेत.

मुंबई - मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज निवड समित्या जाहीर केल्या आहेत. यात विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डी. पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाची कुलगुरु निवड समिती गठीत करण्यात आली आहे, तर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकरिता कुलगुरु निवड समिती जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ हा १० सप्टेंबर रोजी संपला होता. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. दिंगबर शिर्के यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपव‍िण्यात आला आहे. तब्बल पाच महिने उलटून गेल्यानंतर राज्यपालांनी या विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी निवड समिती जाहीर केली आहे. युजीसीचे माजी अध्यक्ष डी.पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आता मुंबई विद्यापीठाची कुलगुरू निवड समिती जाहीर करण्यात आली असून त्यात आयआयटी वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये तसेच हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुरेश कुमार (युजीसी प्रतिनिधी) हे मुंबई विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांचा कार्यकाळ दिनांक १८ मे २०२२ रोजी संपल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ कारभारी काळे यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. आता नवीन कुलगुरू निवड समितीत डॉ.अनिल सहस्रबुद्धे यांच्यासह आयआयटी वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये तसेच हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुरेश कुमार (युजीसी प्रतिनिधी) हे मुंबई विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com