IndiGoच्या विमानात प्रवाशाला रक्ताच्या उलट्या; 'या' ठिकाणी तात्काळ इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशाचा मृत्यू

इंडिगो एअरलाइन्सच्या मुंबई-रांची फ्लाइटमध्ये रात्री उशिरा एका प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडली
Indigo Airlines
Indigo Airlinesesakal

इंडिगो एअरलाइन्सच्या मुंबई-रांची फ्लाइटमध्ये रात्री उशिरा एका प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर विमानाचे नागपूर येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मात्र रुग्णालयात नेत असताना या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. यानंतर विमान रांचीला रवाना करण्यात आले.(Latest Marathi News)

मुंबईहून रांचीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बसलेल्या ६२ वर्षीय प्रवाशाला रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यानंतर त्या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नागपूर विमानतळावर तैनात असलेल्या KIMS-किंग्सवे रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने प्रवाशावर उपचार केले, मात्र त्याला वाचवण्यात यश आले नाही.

Indigo Airlines
UP Police Hindu Panchang: अजब! गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारकडून पोलिस स्टेशनला पंचांग; अमावस्या पाहून घालणार गुन्ह्यांना आळा

रात्री आठच्या सुमारास मुंबईहून रांचीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये प्रवाशी देवानंद तिवारी यांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्याचं सांगण्यात आलं. रूग्णालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, प्रवासी क्षयरोग आणि क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) या आजाराने त्रस्त होता. त्याला विमानात मोठ्या प्रमाणात रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला.(Latest Marathi News)

पुढील प्रक्रियेसाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया आणि मंजुरीनंतर, इंडिगो विमानाने नागपूर ते रांचीचा प्रवास पुन्हा सुरू केला.(Latest Marathi News)

विशेष म्हणजे विमानतळावरून रुग्णाला रुग्णालयात आणण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या आठवड्यातच, विमानतळाच्या सुरक्षा क्षेत्रामध्ये नागपूर-पुणे विमानाची वाट पाहत असताना इंडिगोच्या ४० वर्षीय पायलटचा मृत्यू झाला होता.

Indigo Airlines
Mamata Banerjee: 'भाजप हटाव, इंडिया बचाव'; ममता बॅनर्जींकडून मोदी सरकारला 6 महिन्यांची डेडलाईन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com