Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

दंगलीत हरवलेल्या पीडितांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची सूचनाही कोर्टानं केली आहे.
Supreme Court
Supreme Court

नवी दिल्ली : मुंबईत झालेल्या सन १९९२च्या दंगलीतील खटले लवकरात लवकर निकाली काढा, असे निर्देश सुप्रीम कोर्टानं आज राज्य सरकारला दिले. तसेच दंगलीत हरवलेल्या पीडितांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाईची अंमलबजावणी करण्याची सूचनाही कोर्टानं केली आहे. (Mumbai Riots Settle cases of 1992 Mumbai riots Supreme Court direction to Maharashtra government)

Supreme Court
Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

उत्तर प्रदेशातील अयोध्या इथं बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याचे पडसाद मुंबईत उमटले होते. त्याचा परिणाम म्हणजे मुंबईत ६ डिसेंबर १९९२ रोजी दंगल उसळली होती. यामध्ये मोठा नरसंहार झाला होता. सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचं मोठं नुकसानंही झालं होतं.

Supreme Court
Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

या दंगलीच्या सखोल चौकशीसाठी राज्य सरकारनं २५ जानेवारी १९९३ रोजी मुंबई हायकोर्टाचे तत्कालीन न्यायमूर्ती श्रीकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन केला होता. आयोगाच्या शिफारशी २०२२ मध्ये राज्य सरकारने स्वीकारल्या मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. (Latest Marathi News)

४ नोव्हेंबर २०२२ रोजी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशांचं पालन न केल्यामुळं सुप्रीम कोर्टाचे न्या. अभय ओक आणि न्या. उज्वल भुयान यांच्या खंडपीठानं सरकारला फटकारलं होतं.

Supreme Court
Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

तसेच राज्याचे पोलीस महासंचालक व गृह विभागाच्या सचिवांना आयोगानं सुचवलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही यावेळी सुप्रीम कोर्टानं दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com