

Raut Demands Bawankule's Arrest, Citing Minister's 'Confession' of Phone Tapping
Sakal
मुंबई : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वत:च्याच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना फोन टॅपिंगची धमकी देत आहेत. हा गंभीर गुन्हा असून त्यांनी फोन टॅपिंग करतो अशी कबुलीच दिली आहे. बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर इंडियन टेलिग्राफ ॲक्टखाली गुन्हा नोंदवून त्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केली आहे.