

मुंबई - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात डेंगीसह डासजन्य आजारांचा धोका कायम असला, तरी यंदा डेंगी, मलेरिया आणि चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे राज्याच्या राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र, राज्यातील सर्वाधिक डेंगी रुग्ण मुंबईत आढळल्याने आरोग्य विभागाने नागरिकांना अधिक सजग राहण्याचे आवाहन केले आहे.