Mumbai Accident : 15 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; काच साफ करणाऱ्या कामगारांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai lift Accident

Mumbai Accident : 15 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; काच साफ करणाऱ्या कामगारांचा मृत्यू

मुंबईः मुंबईतल्या वरळीमध्ये एका १५ मजली इमारतीची लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. काचा साफ करणाऱ्या दोन कामगारांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे.

वरळीतील अविघ्न टॉवरचं १५ मजल्यांचं बांधकाम पूर्ण झालं असून लिफ्ट बसवण्याचं काम सुरु होतं. या इमारतीच्या काच पुसण्याचं काम काही कामगार लिफ्ट ट्रॉलीच्या सहाय्याने करीत होते. तेव्हा अचानक ही ट्रॉली खाली कोसळली.

हेही वाचाः प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

या घटनेमध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. यापूर्वी ४ जानेवारी रोजी मुंबईतल्या विक्रोळी भागामध्ये अशीच घटना घडली होती. येथील सिद्धीविनायक सोसायटीच्या पार्किंगची लिफ्ट कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. आज वरळीत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: सहलीला गेलेले औरंगाबादचे विद्यार्थी रायगडच्या समुद्रात बुडाले; चौघांना वाचवण्यात यश

इमारतीच्या खिडक्यांच्या काच पुसण्याचं काम हे कामगार करीत होते. लिफ्ट कोसळल्याने परिसरात मोठा आवाज झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे.

टॅग्स :Mumbai NewsaccidentWorli