
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसह इतर आरोपींना अटक करण्यात आलीय. वाल्मीक कराडचे आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याचं म्हणत विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप केले जात आहेत. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवण्यात यावं अशी मागणी होतेय. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना विचारलं असता धनंजय मुंडेंचा राजीनामा का घ्यावा, जो पर्यंत काही सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही असं भुजबळ म्हणाले.