

Municipal Elections See Violence And Unopposed Wins BJP Tops The List
Esakal
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. दिवसभरात अनेक नाट्यमय आणि धक्कादायक घडामोडी घडल्या. बंडखोरांच्या मनधरणीसाठी नेत्यांची अक्षरश: धावपळ झाली. दरम्यान, अर्ज माघारी घेण्याच्या वादातून एकाचा हत्या झाल्यानं खळबळ उडालीय. महापालिकेच्या निवडणुकीला सोलापुरात रक्तरंजित वळण लागलं. तर धुळ्यातही गोळीबाराची घटना घडलीय. नाशिकमध्ये उमेदवाराला त्याच्या समर्थकांनीच कोंडलं. कुणाच्या दबावाने माघार घेऊ नये यासाठी घरात कोंडून समर्थक स्वत: घराबाहेर बसले.