पुणे - अमृत महोत्सवानिमित्त उल्हास ढोले पाटील यांचा शरद पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  या वेळी (डावीकडून) मुक्ता टिळक, नवाब अहमद अलम खाँ, गिरीश बापट, छगन भुजबळ, पवार, उल्हास ढोले पाटील, कमल ढोले पाटील, शशिकांत सुतार, रामभाऊ मोझे आणि अरुण कुदळे.
पुणे - अमृत महोत्सवानिमित्त उल्हास ढोले पाटील यांचा शरद पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी (डावीकडून) मुक्ता टिळक, नवाब अहमद अलम खाँ, गिरीश बापट, छगन भुजबळ, पवार, उल्हास ढोले पाटील, कमल ढोले पाटील, शशिकांत सुतार, रामभाऊ मोझे आणि अरुण कुदळे.

पालिकेचे राजकारण उमगत नाही - शरद पवार

पुणे - ‘एक वेळ तुम्ही आमदार-खासदारकीचे, अगदी मुख्यमंत्री पदासाठी त्या पातळीवरचे राजकारण करू शकता. परंतु, महापालिकेचा आणि तेही पुणे पालिकेच्या राजकारणाचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही. माझा अनेक महापालिकांशी संबंध आला, परंतु मला आजवर पुणे महापालिकेचे राजकारण उमगलेले नाही. या महापालिकेला मोठी परंपरा आहे. तुमची माणसे म्हणून वावरणारे महापालिकेची निवडणूक जाहीर होताच रंग बदलतात,’’ असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. 

माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचा अमृत महोत्सवानिमित्त पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी पवार बोलत होते. उल्हासराव ढोले पाटील सत्कार समितीतर्फे हा कार्यक्रम झाला. महात्मा फुले वसतिगृह ट्रस्टतर्फेही ढोले पाटील यांचा सत्कार झाला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, हैदराबादचे नवाब अहमद अलम खाँ, कमल ढोले पाटील,  खासदार वंदना चव्हाण, आमदार विजय काळे, समितीचे अध्यक्ष शशिकांत सुतार, समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ मोझे, डॉ. शंकरराव तोडकर, अरुणराव कुदळे, बाळासाहेब शिवरकर, शंकरराव निम्हण, बाळासाहेब शिरोळे आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘सलग ३८ वर्षे नगरसेवक म्हणून निवडून येणे सहज सोपे नाही. महापौर झाल्यानंतरही उल्हास ढोले पाटील यांनी सर्वसामान्यांशी असलेली त्यांची बांधिलकी जपत आदर्श प्रस्थापित केला. उल्हासराव हे एकमेव असे महापौर असतील, की पद मिळाल्यानंतरही त्यांनी आपल्या मूळ व्यवसायाशी प्रतारणा न करता घरोघरी जाऊन दूध वाटण्याचे काम (रतीब) सुरूच ठेवले.’’ 

भुजबळ, बापट, टिळक यांचीही या वेळी भाषणे झाली. समितीतर्फे सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. मोझे यांनी प्रास्ताविक केले, तर कुदळे यांनी आभार मानले.

१९५४ मध्ये आई गेली. मी आणि माझा भाऊ तेव्हा अगदी लहान होतो. दोन वेळच्या खाण्याची भ्रांत होती. त्या वेळी वहिनीने आम्हाला वाढवले व सुसंस्कारित केले. मी नक्की कोणत्या पक्षाचा याबाबतीत अनेकदा चेष्टा केली जाते. परंतु, शरद पवार हाच माझा एकमेव पक्ष आहे.
- उल्हास ढोले पाटील, माजी महापौर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com