पुणे : जमिनीच्या वादातून दगडाने ठेचून आणि हत्याराने वार करून तरुणाचा खून

Murder of a young man due to land dispute in Pune
Murder of a young man due to land dispute in Pune

पुणे : जमिनीच्या व्यवहारातील वादातून नातेवाईकानेच एका तरुणाच्या डोक्‍यावर दगडाने आणि हत्याराने वार करून खून केला. ही घटना येरवडा येथील शांतीनगर परिसरात रविवारी रात्री घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप   

विवेक बाळासाहेब पंचमुख (वय 29, रा.लोहगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा भाऊ सुमित पंचमुख (वय 25) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना पुन्हा भाजपसोबत; केले बाजूने मतदान

आनंद पंचमुख (रा. शांतीनगर, येरवडा) संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव येथील जमिनीच्या व्यवहराच्या कारणावरून नातेवाईकांमध्ये वाद सुरू होता. आनंद पंचमुख याने विवेक याला रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास आळंदी रस्त्यावरील बिग बाजारच्या पाठीमागे शांतीनगर परिसरात बोलावून घेतले. त्याठिकाणी त्यांच्यात पुन्हा वाद झाला.

अजित पवार म्हणतात एकमत होत नसेल तर सर्वांनी राजीनामे द्या 

आनंद याने विवेक याला "तू आमच्या जमिनीच्या व्यवहारात पडू नकोस', अशी धमकी दिली. या वेळी भांडणात संशयिताने विवेक याच्या डोक्‍यात दगडाने वार केला. तसेच, कानावर धारदार हत्याराने वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तपास सुरू असून, अद्याप कोणाला ताब्यात घेतलेले नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) रवींद्र कदम यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com