रायगड : मुरूड तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले | heavy rainfall update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rainfall

रायगड : मुरूड तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले

मुरूड : तालुक्यात मंगळवारी विजांच्या कडकडाटासह तासभर कोसळलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने (heavy rainfall) भातशेतीचे २५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले (rice farming loss). या नुकसानीमध्ये कापलेली भात रोपे आणि उडव्यांचा समावेश आहे.
यंदा सुरुवातीपासून पावसाने चांगली साथ दिली होती. त्याचाच परिणाम म्हणून भातशेती तरारली. विक्रमी पीक हातात येईल, अशी अपेक्षा असतानाच अवकाळी पावसाचा तडाखा बसला. कापलेली भात रोपे पावसात सापडल्याने निम्मे अर्धे भात गळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: मुंबई : भारतातील प्रमुख ठिकाणच्या कार्यालयांचे भाडे वर्षभर स्थिर

शिघ्रे येथील शेतकरी संजय बागूल यांनी सांगितले की, या वर्षी निसर्गाच्या प्रकोपामुळे एकापाठोपाठ एक संकटे आली. त्यातून शेतकरी सावरला, पण आता खूप नुकसान झाले.
मागील पूरजन्य स्थितीत शेती नुकसानीचे पंचनामे सरकारने केले. मात्र प्रतिगुंठा भातशेती नुकसानीचे अवघे रुपये ६८ रुपये बँक खात्यात जमा केल्याने खूप निराशा झाल्याचे किसान क्रांती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीधर जंजिरकर यांनी सांगितले.

भात शेतीला प्रति एकर १३ ते १४ हजार रुपये खर्च येत असून जवळपास तेवढेच भातापासून उत्पन्न मिळत असल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान पीक विमा योजनेचा सरसकट लाभ बळीराजाला देणे आवश्‍यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. निसर्गचक्र अचानक बदलत असल्याने भातशेती आतबट्ट्याची ठरत असल्याने ३० टक्के भातशेती पडीक ठेवली जात आहे, ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. अवकाळी पावसामुळे २५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले, असेही त्यांनी सांगितले.

loading image
go to top