वस्तुसंग्रहालयांची माहिती आता एका क्‍लिकवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

राज्य पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारितील १३ वस्तुसंग्रहालयांची माहिती व तेथील विशेष वस्तूंची छायाचित्रे आता एका क्‍लिकवर पाहता येणार आहेत. या सुविधेसाठी पुरातत्त्व विभाग महाम्युझियम ॲप तयार करत आहे.

मुंबई - राज्य पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारितील १३ वस्तुसंग्रहालयांची माहिती व तेथील विशेष वस्तूंची छायाचित्रे आता एका क्‍लिकवर पाहता येणार आहेत. या सुविधेसाठी पुरातत्त्व विभाग महाम्युझियम ॲप तयार करत आहे. 

महाम्युझियम ॲपद्वारे इतिहासप्रेमींना वस्तुसंग्रहालयाचे नाव, कामकाजाचे दिवस व वेळा, गुगल सर्च, लोकेशन, प्रवेश शुल्क, दालनांची थोडक्‍यात ओळख, महत्त्वाच्या वस्तूंची छायाचित्रांसह माहिती असा तपशील समजेल.

वस्तुसंग्रहालयातील काही वस्तूंच्या त्रिमिती प्रतिमाही पाहता येतील. त्यामुळे घरबसल्याही राज्यातील वस्तुसंग्रहालयाची सफर पर्यटक व इतिहासप्रेमींना करता येईल. सध्या राज्य सरकारच्या अखत्यारीतील संग्रहालयांची माहिती ॲपवर देण्यात येईल. आगामी काळात राज्य सरकारकडून अनुदानित वस्तुसंग्रहालयांचीही माहिती देण्याचा मानस आहे, असे ‘पुरातत्त्व’चे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Museums information on one click