मुस्लिम उमेदवारांना 'राष्ट्रवादी'ची संधी

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 जानेवारी 2017

पक्षाची 31 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुंबई महापालिकेत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर 31 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

पक्षाची 31 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुंबई महापालिकेत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर 31 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ही यादी घोषीत केली. आतापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसने 76 उमेदवार जाहीर केले असून, यामध्ये मुस्लिम उमेदवारांना सर्वाधिक संधी दिली आहे. 76 पैकी 20 वॉर्डांत मुस्लिम उमेदवार देत "राष्ट्रवादी'ने प्रतिस्पर्धी कॉंग्रेस व "एमआयएम' या पक्षांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. "राष्ट्रवादी'च्या उमेदवारांमधे बहुतांश पदवीधर उमेदवार असून, युवक व महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सुशिक्षित व तरुण उमेदवार दिल्याने मुंबईत पक्षाचा विस्तार वाढण्याचा विश्‍वास पक्षाला आहे.

याशिवाय, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जाहीरनामा तयार झाल्याची माहिती सचिन अहिर यांनी दिली. 27 किंवा 28 जानेवारीला तो प्रसिद्ध केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: muslim candidate chance in ncp