esakal | मोठी बातमी! नामदेव महाराजांच्या पादुका नेण्याचा चिठ्ठीद्वारे मिळाला मुस्लीम चालकाला मान 
sakal

बोलून बातमी शोधा

st_201905244281 - Copy.jpg

चालक म्हणाले...बा विठ्ठला आता धन्य झालो... 
मानाच्या नऊ पालख्या पंढरपुरजवळील वाखरी येथील विसाव्याच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना श्री पांडूरंगाच्या भेटीला घेऊन येण्यासाठी संत नामदेव महाराजांच्या पादुका त्याठिकाणी जातात. कोरोनामुळे यंदा प्रथमच मानाच्या पालख्या लालपरीतून आणण्यात आल्या. या पार्श्‍वभूमीवर संत नामदेव महाराजांच्या पादुकाही एसटीतूनच वाखरीला जाणार होत्या. याचा मान एका चालकाला देण्यासाठी दहा चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या. त्यात चार माळकऱ्यांसह इतर समाजातील व्यक्‍तींचा समावेश होता. विशेषत: त्या दहा चालकांमध्ये एकच मुस्लीम चालक होता. चिठ्ठीद्वारे प्रथमच मुस्लीम समाजातील चालकास हा मान मिळाला आणि चालक आरिफ शेख म्हणाले, 'बा विठ्ठला आता धन्य झालो'. 

मोठी बातमी! नामदेव महाराजांच्या पादुका नेण्याचा चिठ्ठीद्वारे मिळाला मुस्लीम चालकाला मान 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : मानाच्या नऊ पालख्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीतून प्रथमच वाखरी येथील विसाव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या. त्यांना घेऊन येण्यासाठी संत नामदेव महाराजांच्या पादुका एसटीतून नेण्याचा मान प्रथमच मुस्लीम चालकास मिळाला. तो मान त्यांनी आनंदाने स्वीकारुन मानाच्या नऊ पालख्या पांडूरंगाच्या भेटीला आणल्या. 

खूप वर्षांपूवी संत ज्ञानेश्‍वर महाराज (माऊली), संत तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संत महात्म्य पांडूरंगाच्या दर्शनासाठी पायी वारी करायचे. पंढरपूरजवळील वाखरी येथील विसाव्याच्या ठिकाणी आल्याचा निरोप मिळताच संत नामदेव महाराज त्यांना घेऊन येण्यासाठी त्याठिकाणी जात होते, अशी अख्यायिका आहे. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु असून मानाच्या नऊ पालख्या वाखरीत दाखल झाल्यानंतर त्यांना आणण्यासाठी संत नामदेव महाराजांच्या पादुका त्याठिकाणी जातात. यंदा कोरोनामुळे प्रथमच ही सर्व परंपरा एसटी बसमधून पार पडली. दरम्यान, संत नामदेव महाराजांच्या पादुका वाखरीतील विसाव्याच्या ठिकाणी घेऊन जाणे आणि तेथून मानाच्या नऊ पालख्या पांडूरंगाच्या भेटीसाठी आणण्याचा मान मुस्लीम समाजाचे बस चालक आरिफ शेख यांना मिळाला. विशेष म्हणजे दहा चालकांची नावे निश्‍चित करुन चिठ्ठीद्वारे एकाची निवड केली जाणार होती. त्या दहा जणांमध्ये चार माळकरी आणि अन्य समाजाचे सहा चालक होते आणि एकच मुस्लीम चालक होता. हा मान मुस्लीम चालकास मिळाल्याने त्यांचा आनंद गगनाला मावेना. 