मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे : आठवले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे - मुस्लिम समाजाची परिस्थिती अत्यंत बिकट असून शैक्षणिक आणि इतर सर्वच क्षेत्रामध्ये हा समाज मागे राहिला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

रिपब्लिकन मुस्लिम आघाडीच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी ही मागणी केली. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका फरजाना शेख, सोनाली लांडगे, हिमाली कांबळे, मातंग आघाडीचे हनुमंत साठे, शहराध्यक्ष वसिम पहेलवान, इकबाल अन्सारी, आयुब शेख आदी मान्यवर उपस्थित होते. मराठा समाजाच्या आरक्षणास आपला सुरवातीपासून पाठिंबा आहे. परंतु, मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने लढा उभारावा, असे आवाहनही आठवले यांनी केले.

Web Title: Muslim Society Reservation Ramdas Athawale