विधानसभा अध्यक्षपद निवडणूक : मविआचे मंत्री घेणार राज्यपालांची भेट

अजित पवार, अशोक चव्हाणांचे शिष्टमंडळ घेणार भेट
Governor Bhagat Singh Koshyari
Governor Bhagat Singh Koshyarisakal

मुंबई : सध्या राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी, यासाठी आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहेत. आज (सोमवार) संध्याकाळी ६ वाजता हे मंत्री राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. (MVA govt Minister to meet Governor for Assembly Speaker Election)

Governor Bhagat Singh Koshyari
शिवसेना भवनात उद्या पत्रकार परिषद, संजय राऊत करणार नवा धमाका?

यंदाच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड व्हावी ही सरकारची आग्रही मागणी आहे. त्याचसाठी राज्यपालांनी वेळ द्यावा, अशी विनंती या मंत्र्यांकडून राज्यपालांना करण्यात येणार आहे. या मंत्र्यांच्या शिष्टमंडळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश असणार आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील सर्व प्रक्रिया सरकारकडून पूर्ण झाली होती. मात्र राज्यापलांनी यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता.

Governor Bhagat Singh Koshyari
निफ्टी सात महिन्यांच्या निचांकी पातळीवर, सेन्सेक्स 1491 अंकांनी कोसळला

दरम्यान, गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची यासंदर्भात भेट घेतली होती. तेव्हा राज्यपाल सकारात्मक असून लवकरच निवडणुकीची तारीख देतील असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा याची आठवण करुन देण्यासाठी मंत्र्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे.

Governor Bhagat Singh Koshyari
शेन वॉर्नचा मृत्यू कसा झाला? थायलंड पोलिसांनी तपासानंतर केला 'हा' दावा

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानानं घेण्याच्या प्रक्रियेवर राज्यपालांची सहमती नाही. त्यामुळं विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रखडलेली आहे. यापार्श्वभूमीवर या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक पार पडण्याचा आशा सरकारला आहे, त्यामुळं आजची बैठक महत्वाची ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com