लाडकी बहीणचे पैसे येईनात, निराधार योजनेचा लाभ ५ तारखेला फिक्स! सोलापूर जिल्ह्यात वाढल्या ५१४६ निराधार महिला; संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाची माहिती आता क्युआरकोडवर

जुलैपासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत लाभार्थीच्या बॅंक खात्यात जमा होणे अपेक्षित आहे, मात्र तसे होत नाही. दुसरीकडे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीला तेवढीच रक्कम दरमहा ५ तारखेपर्यंतच मिळते.
maharashtra, solapur
maharashtra, solapursakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : जुलैपासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत लाभार्थीच्या बॅंक खात्यात जमा होणे अपेक्षित आहे, मात्र तसे होत नाही. दुसरीकडे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीला तेवढीच रक्कम दरमहा ५ तारखेपर्यंतच मिळते. ‘लाडकी बहीण’मध्ये नव्या लाभार्थीची नोंदणी होत नाही आणि निराधार योजनेत दरमहा लाभार्थी निवडले जातात. त्यामुळे ६५ वर्षांपेक्षा कमी असलेल्या विधवा, घटस्फोटित, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त महिलांची पसंती ‘लाडकी बहीण’ऐवजी निराधार योजनेलाच आहे. त्यामुळे जानेवारीपासून जिल्ह्यात निराधार योजनेत पाच हजार १४६ लाभार्थी वाढले आहेत.

संजय गांधी निराधार योजना ४५ वर्षांपूर्वीची जुनी असून सुरवातीला लाभार्थीस दरमहा ६०० रूपये, त्यानंतर एक हजार रूपये आणि आता दरमहा १५०० रूपयांचा लाभ मिळतो. सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे एक लाख ५७ हजार ७८७ लाख लाभार्थी आहेत. त्यात निराधार योजनेच्या ७१ हजार ४७३ लाभार्थींचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या दारिद्रय रेषेखालील योजनेचे जिल्ह्यात ३० हजार ४६४ लाभार्थी असून त्यांना केंद्राकडून २० टक्के आणि राज्य सरकारकडून ८० टक्के हिस्सा मिळतो. यात विधवा, दिव्यांग व ६५ वर्षांवरील वृद्ध महिलांचा समावेश आहे. दरम्यान, नवे लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात का याची पडताळणी जिल्हास्तरावर करण्याची सोय नाही. त्यामुळे निराधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे बॅंक पासबूक पाहिले जाते. याशिवाय त्यांच्याकडून शासनाच्या कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेत नसल्याचे स्वयंघोषणापत्र देखील घेतले जात आहे.

सोलापूर शहरातील नऊ हजार लाभार्थी सापडेनात

सोलापूर शहरात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ४६ हजार लाभार्थी आहेत. त्यापैकी शहरातील नऊ हजार लाभार्थी आणि उत्तर तहसील कार्यालयाकडील पाच हजार लाभार्थी डीबीटी प्रणाली सुरू झाल्यापासून संबंधित कार्यालयाकडे फिरकलेलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या याद्या संबंधित तहसील कार्यालय, तलाठी कार्यालयात लावण्यात आल्या आहेत. आता त्या लाभार्थींना पुढील लाभासाठी डीबीटी पोर्टलवर हयातीचा दाखला, बॅंक पासबूक, आधारकार्ड (बॅंक खात्याशी लिंक केलेले) अशी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. त्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेजवळील संजय गांधी निराधार योजनेच्या शहर कार्यालयात येऊन कागदपत्रे अपलोड करावी, असे आवाहन तहसीलदार शिल्पा पाटील यांनी केले आहे.

क्युआर कोड स्कॅन केल्यास मिळेल माहिती

सोलापूर शहराच्या हद्दीतील लाभार्थींसाठी स्वतंत्र क्युआर कोड तयार करण्यात आला आहे. लाभार्थींनी तो क्युआर कोड मोबाईलमध्ये स्कॅन करून स्वत:चा आधारकार्ड क्रमांक टाकला की लाभार्थींना त्यांच्या लाभाची रक्कम कोणत्या बॅंकेत जमा झाले हे समजते. याशिवाय लाभ जमा झाला नसेल तर त्यांना पैसे का आले नाहीत, याचे कारणही समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com