NA Cancelled: जमिनीचा औद्योगिक वापर करावयाचा असल्यास त्यासाठी बिगरशेती (एनए) परवानगी आवश्यक असणार नाही. याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली..Rahul Solapurkar: शिवरायांवर वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरांवर उदयनराजे संतापले; म्हणाले, गोळ्या घातल्या....'इज ऑफ डुईंग बिझनेस' अंतर्गत निर्णयकेंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या व्यापार सुलभता (इज ऑफ डुईंग बिझनेस) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जमीनधारकांना औद्योगिक वापरासाठी मानीव अकृषिक वापराची परवानगी घेणे आवश्यक होते; परंतु, त्यासाठी लागणारा वेळ हा जमीन एनए करण्यासाठी लागणाऱ्या वेळेएवढाच आहे, हे शासनाच्या निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे..Indigo Airlines: इंडिगो एअरलाईन्स झाली 'भाजप'मय! 2 हजार कर्मचाऱ्यांचा 'पक्ष प्रवेश'.एनए रद्द तरी 'या' असतील अटीजमिनीचा उद्योगासाठी वापर करावयाचा असल्यास परवानगीची तरतूद रद्द होण्यासाठी काही काळाचा अवधी लागणार असल्याने तोपर्यंतच्या कालावधीत एखाद्याला जमीन उद्योगासाठी वापरायची असल्यास त्यालाही एनए परवानगी घेणे आवश्यक नाही. त्यासाठी या उद्योग घटकाने सक्षम नियोजन प्राधिकरणाकडून विकास परवानगी घेतल्यानंतर किंवा नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडे मंजूर करून घेतल्यानंतर त्याची नोंद करण्यासाठी संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे (तलाठी) जावे. त्यानंतर त्या ग्राम महसूल अधिकाऱ्याने लवकरात लवकर ती नोंद त्याच्या दप्तरात करावी, असेही या परिपत्रकात म्हटले आहे..MAITRI2.0 पोर्टलचं अनावरणदरम्यान, काल पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत उद्योग विभागाच्या मैत्री २.० पोर्टलचं अनावरण करण्यात आलं. या पोर्टलचे फायदे म्हणले म्हणजे, उद्योग सुलभीकरणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग वाढणार, विविध परवाने, ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध असल्यानं उद्योगांना शासकीय विभागांकंडं स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही.रिअल टाइम ट्रॅकिंग सिस्टिममुळं अर्जाची स्थिती तपासता येणार, उद्योग मित्र चॅटबॉटद्वारे योजना, परवानगे, सबसिडीची माहिती मिळणार, इन्स्टेंटिव्ह कॅलक्युलेटरही उपलब्ध, महत्वाची कागदपत्रे डिजीलॉकरमध्ये ठेवता येणार, पोर्टलमध्ये १५ विविध विभागांच्या ११९ सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.