'नदीष्ट' कादंबरीला 'मनोरमा विशेष साहित्य पुरस्कार'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 December 2019

  • कवी मनोज बोरगावकरचा सन्मान

नांदेड: मनोज बोरगावकर लिखित 'नदीष्ट' कादंबरीला यंदाचा 'मनोरमा विशेष साहित्य पुरस्कार' जाहीर झाला आहे. मनोरमा साहित्य मंडळ व महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर यांच्या वतिने दरवर्षी साहित्य क्षेत्रात उल्लेखणीय काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुस्कार दिला जातो. यंदाचा स. रा. मोरे ग्रंथालयातर्फे दिला जाणार 'मनोरमा विशेष साहित्य पुरस्कार' नदीष्ट कादंबरीचे लेखक मनोज बोरगावकर यांना जाहीर झाला आहे. बुधवारी (ता. 25) सायंकाळी सोलापूर येथील शिवछत्रपती रंगभवन सभागृहात पुरस्कार वितरण होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नदीत पोहण्याचा प्रचंड छंद असलेल्या नायकाला काही माणसे नदीकिनारी भेटतात. त्यांच्यांशी नायकाची मैत्री होते. कालांतराने  वेगवेगळ्या कारणांनी सर्व मित्र दूर जातात, यावरच मनोज बोरगावकरांच्या 'नदीष्ट' कादंबरीचे कथानक आहे.  

राष्ट्रवादीकडून 'या' दोन नेत्यांना विधानपरिषदेचे गिफ्ट

ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे नदी. सकाळी अंघोळ करणे, दुपारी कपडे धुणे, पोहणे, मासे-खेकडे पकडणे, मोहाळ झाडणे, वाहून आलेले लाकडं  वेचणे, गणपती, दुर्गा, शारदादेवी विसर्जन करणे इत्यादी कामे नदीवर केली जातात. त्यामुळे जनतेचा नदीशी असलेला धनिष्ट संबंध आधुनिक जीवनशौलीमुळे कमी होत चालली आहे. संस्कृती ही नदीच्या काढावर वसली जाते याची माहिती इतिहास व भूगोलाच्या पुस्तकातून मिळते, पण या संस्कृतीचे दर्शन नदीष्ट कादंबरीतून प्रत्यक्षात वाचकांसमोर उभे राहते. नदीकाठच्या वंचितांचे जगणे काय असते, त्यांचे दु:ख याची जाणीन सतत होत राहते. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही ऋतूतही त्याची बदलेली रुपे वाचकांना चलचित्रपटासारखे डोळ्यांसमोर उभी राहते. नदीचा जीवंतपण सजिवसृष्टीच्या अस्तित्वासंबंधी आहे, हा वैश्विक विचार ही कादंबरी सांगून जाते. मनोज बोरगावकरांनी 'नदीष्ट' कादंबरी वाङ्मय क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवत आहे.

उद्धव ठाकरेंचा संभाजीराजेंना फोन; पत्राची घेतली तात्काळ दखल

नदी आणि तृतीयपंथी यांच्या विषयी आस्था बदलाव्यात याच एका ध्यासाने नदीष्ट ही कादंबरी लिहिली आहे. मनोरमा पुरस्काराने लिखाणाला प्रोत्साहन मिळाले. हा सन्मानाचा पुरस्कार दिल्याबद्दल मनोरमा साहित्य मंडळाचे मनःपूर्वक आभार. वाचकांनी उदंड प्रतिसाद दिल्यामुळे चार महिन्यांत नदीष्टची दुसरी आवृत्ती निघाली. अशा तमाम वाचकांना हा पुरस्कार समर्पित करतो, आणि ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरकर यांचे मनःपूर्वक आभार मानतो.- मनोज, बोरगावकर, लेखक,


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nadist novel got Manorama Literature Award