Maharashtra Local Body Elections
esakal
नगरपरिषदा-नगरपंचायतींच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्य निवडणूक आयोगाने आता नामनिर्देशनपत्र भरण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. त्यानुसार उमेदवारांना आता ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशपत्र भरता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवरांच्या मागमीनंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे. इतकच नाही, तर आता शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही उमेदवारांना अर्ज भरता येणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.