

Congress leader Nitin Raut addressing media amid controversy over nominated member selection in Nagpur Municipal Corporation.
esakal
नागपूर महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून काँग्रेसमधील अंतर्गत खदखद उघड झाली आहे. माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार नितीन राऊत यांनी विकास ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवत गंभीर आरोप केले आहेत. एकीकडे दोन्ही प्रदेशाध्यक्षांनी दोन्ही आमदारांना एकेक स्वीकृत सदस्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या, तरीही विकास ठाकरेंनी मनाप्रमाणे दोन्ही जागा भरल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पक्षात त्यांचा आणि त्यांच्या नगरसेवकांचा अपमान होत असेल तर त्यांना भूमिका घ्यावी लागेल आणि आवश्यकता पडल्यास ते पक्ष सोडण्याची तयारी आहे.