राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

नागपूर - राज्यावर भाजप-सेनेच्या युती सरकारने साडेचार लाख कोटींचे कर्ज केले. त्यामुळे हे राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे, असा दावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला. 

नागपूर - राज्यावर भाजप-सेनेच्या युती सरकारने साडेचार लाख कोटींचे कर्ज केले. त्यामुळे हे राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे, असा दावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला. 

विरोधी पक्षाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, चार वर्षे राज्याचे अर्थमंत्रिपद सांभाळले. त्यामुळे राज्याच्या आजच्या स्थितीवरून ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याचे मी सांगू शकतो. डीपीडीसीच्या बैठकांमधून याचा प्रत्यय येत असून, विकासकामांना ३० टक्के कट लावला आहे. ओबीसींसाठी साडेपाचशे कोटींच्या शिष्यवृत्तीची तरतूद आघाडी सरकारने केली होती. या सरकारने ती ५० कोटींवर आणली. आता राज्य शासनातील जागा कमी करण्याचे पिल्लू सोडण्यात आले. राज्यातील रस्ते तयार करता येत नाही, केवळ खड्डे  बुजविण्यावर भर देण्यात येत आहे. 

आता सरकारच्या खोटारडेपणाचे पाप पुढे आले. राज्यातील सर्व भागातील शेतकरी वैतागला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दावा सरकार करीत आहे. निदान ज्यांचे कर्जमाफ झाले, त्यांची यादी रकमेसह द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी १२ डिसेंबरला विराट जनआक्रोश  हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची मोर्चा काढण्याची ठिकाणे वेगवेगळी असली तर एका ठिकाणावर सर्वच जण एकत्र येणार असल्याचे सांगितले.

Web Title: nagpur maharashtra news ajit pawar talking on state