स्वस्त चहाचा घ्या मस्त स्वाद; किलोमागे ५० रुपयांनी दर झाले कमी

Rs fifty less per kg of tea read full story
Rs fifty less per kg of tea read full story
Updated on

नागपूर : यंदा चहाचे दर तब्बल ५० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे आता स्वस्त चहाचा मस्त स्वाद चहाशौकीनांना घेता येणार आहे. महागाईचा दर वाढत असताना ग्राहकांना यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.

मार्च महिन्यात दरवर्षी चहाची तोड सुरू होते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देशभरात सर्वत्र टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे चहाच्या तोडीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. जूननंतर चहाची तोड सुरू करण्यात आली. त्यावेळी आलेल्या अवेळी पावसामुळे चहाच्या बागेतील पिकांचे नुकसान झाल्याने फक्त ५० टक्केच चहाचे उत्पादन झाले. त्यातही चहाची गुणवत्ता सुमार होती.

मागणी आणि पुरवठा यात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली. कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिकांकडूनही चहाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी, चहाच्या दरात विक्रमी भाववाढ झाल्याने अनेकांचे बजेट बिघडले होते. आता चहातोडणीचा मोसम संपला असून, विक्रेत्यांनी चहाची साठवणूक करून ठेवलेली आहे.

दक्षिण भारतातील चहाची गुणवत्ताही सुमार असल्याने त्याच्या दरात सर्वाधिक घट झाली आहे. मात्र, उत्तर भारतातील चहाची गुणवत्ता चांगली असल्याने अद्याप त्या भागातील चहाला चांगले दर असले, तरी २० ते ३० रुपयांची घसरण झालेली आहे. चहाचे नवीन उत्पादन आता मार्च महिन्यात बाजारात येणार आहे. त्यामुळे आता पुढील मार्चपर्यंत तरी चहाचे दर स्थिर राहण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

चहा उत्पादनाचा मोसम आता संपला
चहा उत्पादनाचा मोसम आता संपला असून कमी गुणवत्तेचा चहा बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. चांगली गुणवत्ता असलेल्या चहाच्या दरात मात्र किरकोळ घट झाली आहे. 
- अनिल अहीरकर,
माजी अध्यक्ष, दि नाग विदर्भ टी मर्चंट असोसिएशन

साधारण दर्जाचा चहा

  • एक महिन्यापूर्वीचे दर - ३०० ते ३१० रुपये किलो 
  • आताचे दर - २४० रुपये किलो 

चांगल्या गुणवत्तेचा चहा

  • एक महिन्यापूर्वीचे दर - ४५० ते ५०० रुपये किलो 
  • आताचे दर - ४२० ते ४६० रुपये किलो

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com