सुप्रिया सुळे, देशमुख ताब्यात

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल दिंडी शहराच्या उंबरठ्यावर पोचताच कार्यकर्त्यांनी ‘रास्ता रोको’ सुरू केला. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कार्यकर्ते व पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. चिडलेल्या कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखली; तसेच यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसह झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यवतमाळ येथून काढलेली हल्लाबोल दिंडी रविवारी नागपूर जिल्ह्यात पोचली होती. सोमवारी अकराव्या दिवशी सकाळी दिंडीने शहराच्या दिशेने आगेकूच केली. वर्धा मार्गावर विमानतळासमोर अचानक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडत वाहतूक रोखून धरली. पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण ते जुमानत नव्हते. परिणामी अत्यंत वर्दळीच्या वर्धा मार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलक रस्त्यावरून उठण्यास तयार नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करीत खासदार सुप्रिया सुळे, अनिल देशमुखांसह अन्य नेत्यांना ताब्यात घेत पोलिस वाहनात बसविले. यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिस वाहनांच्या चाकातील हवा काढून पुन्हा ‘रास्ता रोको’ आंदोलन करीत वाहतूक रोखली. वातावरण निवळल्यानंतर नेत्यांची सुटका करण्यात आली. बुधवारी (ता.१३) हल्लाबोल मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. 

Web Title: nagpur news supriya sule anil deshmukh