वाहनाचा फोटो पाठवा अन्‌ पुरस्कार मिळवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

नागपूर - एक एप्रिलपासून वाहतूक आणि प्रदूषण रोखण्यासाठी नवी नियमावली तयार केली जात आहे. त्यात रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाचा फोटो पोलिसांना पाठविल्यास दंडाची 50 टक्‍के रक्‍कम पुरस्कार म्हणून फोटो काढणाऱ्यास दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्तेवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली.

शहर पोलिस आयुक्तालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालयासाठी उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक व सुसज्ज पोलिस भवनाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, की अपघातमुक्त जिल्हा आणि शहर करण्यासाठी रस्त्यांवरील अपघातप्रवण स्थळांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. केंद्र शासनाने खासदारांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती गठित केली आहे. एक एप्रिलपासून वाहतूक आणि प्रदूषण रोखण्यासाठी नवी नियमावली तयार करण्यात येत आहे. रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाचा फोटो पोलिसांना पाठविल्यास दंडाची 50 टक्‍के रक्‍कम पुरस्कार म्हणून फोटो काढणाऱ्यास देण्यात येणार आहे.

Web Title: nagpur news vehicle photo award nitin gadkari