

Another Education Officer Arrested in Shalarth ID Scam
Sakal
नागपूर : बनावट शालार्थ आयडी प्रकरणी सायबर पोलिसांनी आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला मंगळवारी (ता.२३) सकाळी अटक केली. यवतमाळ येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र शंकरराव काटोलकर असे आरोपी शिक्षणाधिकाऱ्याचे नाव असून त्यांना आज सकाळी यवतमाळ येथून पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदभार असताना, ३९ बनावट शालार्थ आयडी तयार केले होते.