

Security forces deployed across Nagpur as authorities implement high-alert measures for the Winter Assembly Session following intelligence reports of a possible terror threat.
esakal
Nagpur Winter Session : नागपूर येथे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद ही भारतात घातपात घडवू शकते, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्याने राज्याच्या उपराजधीनीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय, रेशीमबागेसह सर्वच महत्त्वाची धार्मिक स्थळे व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. शहरात राज्य राखीव पोलिस दलाच्या पाच तुकड्या, होमगार्डसह दहा हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत.