नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी 1720 कोटी; राज्य सरकारची मान्यता!

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana: केंद्र सरकारप्रमाणेच महाराष्ट्र राज्य सरकारनेदेखील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. तशी मंत्रिमंडळात या योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेंतर्गत केंद्राप्रमाणे 4 महिन्यांत 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील. पीएम सन्मान निधीचे लाभार्थी शेतकरीच राज्य योजनेसाठी पात्र असतील असेही घोषित केले होते, परंतु राज्य सरकारच्या निधीचा एकही हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.

दरम्यान राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ‘नमो शेतकरी महासन्मान निधी‘ ही योजना उपमुख्यमंत्री व तत्कालीन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केली होती.

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana
Amartya Sen: नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या निधनाची अफवा; मुलीनं वृत्ताचा केला इन्कार

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये 6000 या अनुदानामध्ये राज्य शासनाच्या आणखी 6000 इतक्या निधीची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना राबवण्यास जून 2023 मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीच्या पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे. पी.एम.किसान योजनेप्रमाणे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटीकडून गतीने सुरू आहे. तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana
Yashomati Thakur: यशोमती ठाकुरांची तुलना थेट इंग्रजांशी; भाजप खासदाराच्या वादग्रस्त विधानामुळं वाद पेटणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com