
मुंबई : ओबीसी आरक्षणावरुन मुद्दा पेटलेला असताना आज देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपा नेत्यांचा ओबीसी मेळावा घेतला आहे. त्यामध्ये त्यांनी महाविकासआघाडीवर हल्लाबोल केला असून त्यांच्या कारभारामुळे ओबीसीला आरक्षण मिळालं नाही आणि महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असा आरोप त्यांनी लावला आहे. त्यांच्या या मेळाव्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची ठरवून कत्तल केली. खून केला. यामागे मोठं षडयंत्र आहे. २०१० साली पहिल्यांना कोर्टाने ५० टक्के आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं होतं. मात्र, काँग्रेस सरकारने काही केलं नाही, असा आरोप विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी केला होता. त्यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा असा कार्यक्रम आहे की, खोटं बोला पण रेटून बोला. खरं तर ओबीसी समाजाचं राजकीय नुसकान भाजपामुळे झालंय असा आरोप त्यांनी फडणवीसांवर केला आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बोलताना २०१७ मध्ये ते मुख्यमंत्री असताना जिल्हापरिषद नागपूरला कसं एक्स्टेशन दिलं? भंडारा, गोंदिया, वाशिम या सर्वांना वाटलं नागपूरला जर एक्सटेशन मिळत असेल तर आम्हालाही मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती असा आरोप त्यांनी लावला आहे. फडणवीसांनी केलेले आरोप म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे. पदाचा असा दुरूपयोग करून देश कसा चालवायचा हे भाजपाकडून शिकावं. सिनेमात जय विरू हे हिरो होते पण हे तर खलनायक आहेत असा टोला त्यांना लावला आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात आम्ही विधानसभेत प्रश्न उपस्थित केला त्यामुळे कारवाईला वेग आला असं त्यांनी सांगितलं. तसेच मंत्र्यांच्या बंगल्यावरुन बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात एखादा मंत्री असेल तर त्याला बंगला मिळतो, अजून मला शासनाकडून पत्र मिळालेलं नाही त्यामुळे खाली कसं करणार? असं म्हणत यापूर्वी दानवेही राहत होतेच असं ते बोलताना म्हणाले.
दरम्यान सध्या ओबीसी आरक्षणावरुन राज्यभर मुद्दा पेटला आहे आणि याच कारणावरुन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत पण सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा परत वर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.