'मैत्रिचा हात पुढे करून राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसलाय', पटोलेंचं 'टार्गेट पवार'

nana patole
nana patoleTeam eSakal

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आणखी एका विधानामुळे महाविकास आघाडीत वातावरण गरम होण्याची शक्यता आहे. भंडारा गोंदियात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला एकाकी पाडण्यात आलं. राष्ट्रवादीने भाजपसोबत आघाडी केल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतापले आहेत. त्यांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी ट्वीट केलंय. (Nana Patole Tweets on NCP)

nana patole
भंडाऱ्यात काँग्रेस एकाकी, राष्ट्रवादीची भाजपसोबत युती

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृहजिल्ह्यातील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची करत भाजपला सुरूंग लावला व भाजपमधल्या माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाने बंड करून काँग्रेसला यश मिळवून दिले.

या बंडखोरीमुळे व भंडाऱ्यासोबतच गोंदिया येथील निवडणुकांत राष्ट्रवादीने भाजपाशी हातमिळवणी करून काँग्रेसला एकाकी पाडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान वाघमारे यांना भाजपातून निलंबित केल्याची घोषण पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यानंतर नाना पटोले भलतेच नाराज झाले आहेत.

गोंदियात भाजप-राष्ट्रवादी

गोंदिया जिल्हा परिषदेतही आज मंगळवारीच जि.प. पदाधिकाऱ्यांची निवड होती. तेथेही भंडारा जिल्हा परिषदेप्रमाणेच भाजपा व राष्ट्रवादीने युती केली. ५३ सदस्यीय गोंदिया जि.प.मध्ये २६ सदस्यीय भाजपला बहुमतासाठी केवळ एका मताची गरज होती. तेथे काँग्रेसचे १३ व राष्ट्रवादीचे ८ सदस्य निवडून आले होते. अन्‍य सदस्यांमध्ये ४ सदस्य चावी संघटनेचे, तर २ सदस्य अपक्ष होते. येथे काँग्रेसला एकाकी पाडून भाजपचा अध्यक्ष, तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष निवडून आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com