डबे नाही, इंजिन बदला; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

डबे नाही, इंजिन बदला; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

पुणे : ‘‘इंजिन बदलण्याची गरज आहे. डबे बदलून काही उपयोग होणार नाही,’’ अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलावर टीका केली. ओबीसी आरक्षणाचा प्रश्नही भाजपमुळेच निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पटोले पुण्यात आले होते. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा पक्षाचा विचार असून त्यादृष्टीने चाचपणी सुरू केल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

पटोले म्हणाले, इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली. त्याकडे लक्ष देण्याऐवजी देशात जातीपातीचे राजकारण करणारी विध्वंसक व्यवस्था उभी राहिली आहे. या अत्याचारी व्यवस्थेच्या त्रासाविरोधात काँगेसने राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरु केले आहे. काँग्रेसने देश उभा केला आणि यांनी देश बरबाद केला. राहुल गांधी यांनी नोटबंदी, जीएसटीवर वेळोवेळी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. परंतु, त्यांची चेष्टा केली गेली. कोरोनाबाबत ही त्यांनी सरकारला सूचित केले होते. परंतु, त्याकडेही दुर्लक्ष केले. ते जे बोलत होते, ते आज खरे होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

डबे नाही, इंजिन बदला; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
...तरच विधानसभा अध्यक्षपद स्वीकारणार - भास्कर जाधव

ते म्हणाले, ‘‘प्रदेश काँग्रेसमध्ये वाद नाही. प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने तयार करायचा अधिकार आहे. दोन दिवसच राज्य विधीमंडळाचे अधिवेशन झाले. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड झाली नाही. विशेष अधिवेशन घेऊन ही निवड करता येईल.’’ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरील ‘ईडी’च्या चौकशीबाबत पटोले म्हणाले, ‘‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ या दोन्ही देशातील सर्वोच्च तपासणी यंत्रणा आहेत. परंतु, भाजपने स्वत:च्या सोयीसाठी वापरून त्या चिल्लर केल्या आहेत.’’

डबे नाही, इंजिन बदला; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
राज्यातील वरिष्ठ IAS आधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या

कॉंग्रेसनेच इंजिन बदलावे - फडणवीस

केंद्र सरकारने मंत्रिमंडळात केलेल्या फेरबदलावर ‘डबे बदलून उपयोग नाही, इंजिन बदलण्याची गरज आहे,’ अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्यावर फडणवीस म्हणाले,‘‘नाना त्यांच्या पक्षाबद्दल बोलत होते वाटते. त्यांच्याकडे राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे इंजिन बदलण्याची गरज आहे.’’ अधिवेशन जवळ आले, की डेल्टा येतो, केल्टा येतो. परंतु अधिवेशन संपले की त्याची चर्चा थांबते. असे का होते, हे समजत नाही. जनतेचे प्रश्‍न मांडण्याची जी सर्व आयुधे वापरता येत नाही, असा ठराव करण्यात येतो. त्याला विरोध केला, तर आमच्या बारा आमदारांना निलंबित केले पण आम्ही प्रश्‍न मांडतच राहू, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com