esakal | राज्यातील वरिष्ठ IAS आधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या
sakal

बोलून बातमी शोधा

Mantralay

राज्यातील वरिष्ठ IAS आधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या

sakal_logo
By
नामदेव कुंभार

दहा दिवसानंतर पुन्हा एकदा राज्यातील वरिष्ठ आयएएस आधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 30 जून रोजी राज्यातील सात आयएएस आधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा 9 जुलै रोजी सात आयएएस आधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पीएमपीएमएल अर्थात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला या बदल्यांनंतर नवे व्यवस्थापकीय संचालक मिळाले आहेत. २०१२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यावर पीएमपीएमएलची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासोबतच कोकण विभागाला देखील नवे विभागीय आयुक्त मिळाले आहेत. पाहूयात कोणाची कुठे बदली झाली आहे....

कुणाची कुठे झाली बदली?

1) लक्ष्मीनारायण मिश्रा (२०१२ बॅच) यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर बदली करण्यात आली आहे.

2) व्ही. बी. पाटील (२००० बॅच) यांची कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

3) विजय वाघमारे (२००४ बॅच) यांची अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली.

4) श्रीमती विमला आर (2009 बॅच) यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

५) डॉ. राजेंद्र भारूड (2013 बॅच) यांची पुण्यातील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदावर बदली

6) जलाज शर्मा (2014 बॅच) यांची धुळ्याच्या जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

७) श्रीमती मनिषा खत्री (2014 बॅच) यांची नंदुरबारच्या जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

loading image