
देशात काँग्रेस आजही बापच, नाना पटोले यांनी सुजय विखेंना सुनावले
औरंगाबाद : महाविकास आघाडीचा संसार असा आहे, की लग्न हे राष्ट्रवादी शिवसेनेचे आहे. राष्ट्रवादी नवरा, तर शिवसेना बायकोच्या भूमिकेत असून काँग्रेस ही बिनबुलाये वऱ्हाडी असल्याचा टोला भाजपचे खासदार सुजय विखे यांनी आघाडीला लगावला होता. त्याला उत्तर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिले आहे. ते म्हणाले, भाजप देशात काँग्रेसने केलेल्या विकास कामावरच आपले ढोल वाजवत आहे. आजही देशात काँग्रेस (Congress Party) बापच आहे, सुजय विखे (Sujay Vikhe) अजून लहान आहेत, असा खोचक टोला पटोलो यांनी विखेंना लगावला आहे. (Nana Patole Criticize Sujay Vikhe And Said Still Congress Party Father In Country)
हेही वाचा: अब्दुल सत्तारांमुळेच मी खासदार झालो, इम्तियाज जलील यांचा दावा
औरंगाबाद (Aurangabad) येथे पक्षाच्या डिजिटल सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यासाठी पटोले आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात आहे. मोदींनी गुजरातमध्ये दबावाचे, सूडाचे जे राजकारण राबवले तो पॅटर्न ते विरोधकांना संपवण्यासाठी वापरत आहेत. वास्तविक स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसने केलेल्या विकासामुळेच देश प्रगती पथावर दिसत आहे.
हेही वाचा: मायावती यांनी पक्षात केले मोठे फेरबदल, बसपाच्या सर्व समित्या बर्खास्त
देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. गलवान खोऱ्यात चीनकडून भारतीय जवानांना क्रूरतेने मारले. एक मारला, तर शंभर मारु अशी भाषा करणारे गप्प राहिले आहेत, अशी टीका पटोले यांनी मोदींवर केली.
Web Title: Nana Patole Criticize Sujay Vikhe And Said Still Congress Party Father In Country
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..