
अब्दुल सत्तारांमुळेच मी खासदार झालो, इम्तियाज जलील यांचा दावा
औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युती करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावरुन राज्यात चर्चांना उधाण आले होते. शेवटी महाविकास आघाडीने युतीचा प्रस्ताव फेटाळून लावला. मात्र प्रयत्न सोडणार नसल्याचे जलील यांनी सांगितले होते. त्यासाठी उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी भेटणार असल्याचे ते म्हणाले होते. आता जलील पुन्हा चर्चेत आले आहेत. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मदतीमुळेच मी खासदार झालो, असा गौप्यस्फोट जलील यांनी केला आहे. मात्र या विधानामुळे माजी खासदार चंद्रकांत खैरे या प्रतिक्रिया देतात? हे पाहावे लागणार आहे. (Imtiaz Jaleel Says, Because Of Abdul Sattar I Have Become Member Of Parliament)
हेही वाचा: लग्न हे राष्ट्रवादी शिवसेनेचं आहे, काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी : सुजय विखे
औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील खंडाळा (ता.वैजापूर) येथे शनिवारी (ता.२६) पार पडलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री सत्तार, आमदार रमेश बोरनारे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले, सत्तारांबद्दल बोलताना लोक त्यांची ओळख महाराष्ट्राचे महसूल राज्यमंत्री अशी करुन देतात. पण ते राजकारणातील किंगमेकर आहेत. सत्तारांची कृपादृष्टी असणारा लगेच मोठा होतो.
हेही वाचा: मायावती यांनी पक्षात केले मोठे फेरबदल, बसपाच्या सर्व समित्या बर्खास्त
मात्र ते ज्याच्यावर नाराज होतात त्याचा वाईट काळ सुरु होत असल्याचे जलील म्हणतात. सत्तारांशी घट्ट मैत्री असून ते मोठ्या भावाप्रमाणे आहेत. मला खासदार करण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे जलील म्हणाले. आज सत्तार शिवसेनेत असले तरी मी जे सांगितले ते खरे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
Web Title: Imtiaz Jaleel Says Because Of Abdul Sattar I Have Become Member Of Parliament
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..