
कोणताही टॅक्स न लावल्यामुळे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळेल.
अर्थसंकल्पाला विरोध: भाजप नेत्यांचा नाना पटोलेंनी घेतला समाचार
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या शेतकरी, छोटे उद्योजक सर्वसामान्य घटकांना न्याय देणारा आहे. महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याची भूमिका या अर्थसंकल्पातून घेतली आहे. असे कौतुक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले.
महाविकास आघाडीचे कौतुक करताना पटोले म्हणाले, आज मांडलेल्या अर्थसंकल्पातून एक लक्षात येते की यातून रोजगार निर्मिती होईल, नवे उद्योग सुरु होतील. कोणताही टॅक्स न लावल्यामुळे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळेल.
हेही वाचा: 'मविआ सरकारच्या काळात आदिवासी समाज कमिटीची बैठक झाली का?'
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, या अर्थसंकल्पाने सामान्य माणसाची घोर निराशा केलीयं. आम्ही या ठाकरे सरकारच्या बजेटचा धिक्कार करतो. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना पटोले म्हणाले, केंद्र सरकार देशातील जमीन विकून देश चालवतो. तश्याच पध्दतीचा अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र तश्या पध्दतीचा अर्थसंकल्प राज्यसरकार सादर करत नाही. या सरकारने राज्यातील सर्वसामान्यांचा विचार केला आहे. त्यांना न्याय देण्याचे काम सुरु केले आहे म्हणून भाजपला यांचा राग येतो असे टीकास्त्र पटोले यांनी सोडले.
Web Title: Nana Patole Criticized Bjp Leaders Maharashtra Budget 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..