'केंद्रीय तपास यंत्रणांना राहूल गांधी अन् त्यांचे मावळे घाबरत नाहीत'

कारण खरं कधीही लपून राहत नाही - नाना पटोले
Nana Patole
Nana Patole e sakal
Summary

कारण खरं कधीही लपून राहत नाही - नाना पटोले

काँग्रेस नेते नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी काल ईडीने धाड टाकली आहे. उके यांच्या घरावर पहाटेच्या वेळेस ही करावाई करण्यात आली आहे. सहा तासांच्या चौकशीनंतर सतीश उके आणि त्यांच्या भावाला ईडीने ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले आहेत. दरम्यान या कारवाईनंतर कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी ट्विट करत भाजप आणि तपास यंत्रणांच्या भूमिकेवर ताशेर ओढले आहेत.

Nana Patole
उकेंच्या कारवाईमागील ब्रेन नागपुरातीलच; NCP आमदारचा रोख कुणावर?

ट्विटमध्ये नाना पटोले म्हणतात, आमचे नेते राहूल गांधी अशा तपास यंत्रणांना घाबरतात नाहीत आणि कॉंग्रेसचे मावळेही. कारण खरं कधीही लपून राहत नाही, असं ट्विट करत त्यांनी भाजप आणि ईडीवर टीकास्त्र सोडले आहे.

दरम्यान, ईडीने केलेल्या कारवाईनंतर उके यांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना कुटुंबीयांनी सांगितलं की, सकाळी साडेपाच वाजता ईडीचे अधिकारी आले. आमचे मोबाईल जमा केले. मुलांना शाळेत जाऊन देण्याची मुभा त्यांनी दिली. आम्हाला सतीश उके यांचे कागदपत्र हवे आहेत असं ईडीचे अधिकारी म्हणत होते असं कुटुंबीयांनी सांगितलं. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक केसेस केल्या आहेत. त्यातल्या एका प्रकरणाचा निकाल दोन दिवसात लागणार आहे असंही कुटुंबीयांनी सांगितलं.

Nana Patole
Sanjay Raut On ED: ‘ईडी कारवाई चिंतेचा नाही तर गमतीचा विषय’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com